कोकणात आलेल्या पुरातील लोकांना आपुलकी कडून मदत

आपल्या सर्वांना माहित आहेच कि, गेल्या वर्षी पावसाच्या पुराने कोकणातील चिपळूण मधील दलवटणे या गावाची संपूर्ण वाताहात झाली होती. या गावचा इतर गावांची संपर्क तुटला होता. होत्याचे नव्हते झाले होते. उपासमारी व बेरोजगारीचा कळस गाठला होता. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अशा परिस्थितीत आपुलकीने या गावाला मदतीचा हात दिला. गावकऱ्यांना कपडे, किराणा, व रोख रक्कम अशी मदत पुरवली. एक कुटुंब शिंपी काम करून पोट भरत होते. त्यांची शिलाई मशीन पुरात वाहून गेली. त्यांना मशीन घेऊन दिली. एकाची रिक्षा वाहून गेली त्याला ती दुरुस्त करण्यासाठी आर्थिक मदत दिली. जेमतेम पन्नास उंबरठे असलेले गाव. त्या गावाला या धक्क्यातून सावरण्यासाठी आपुलकीने मदत केली.

आधी ठरल्याप्रमाणे आपण त्यांना चादरी, ब्लॅंकेट्स, टाॅवेल, बेडशीट्स व चटई वाटणार होतो. पण आपल्या आधी त्यांना धान्य,कपडालत्ता,भांडीकुंडी, किराणा आदि मदत पोहचली होती. त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यानंतर असे ठरले की, त्यांना आता रोख पैशांची चणचण आहे. कारण त्यांच्या घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकही वाहून गेले आहे. पुढे चार-सहा महिने शेती करता येणार नाही. कारण शेतात सगळा गाळ साठला आहे. या परिस्थितीचा विचार करता त्यांना रोख रक्कम देण्याचा विचार सर्वानुमते ठरला.

आपण एकूण 51 कुटुंबांना रोख रक्कम वाटली. दळवटणे गावातील 44 कुटुंबांना प्रत्येकी रु. 2000/- तसेच चिपळुण मधील पाच कुटुंबांना नुकसान झाल्याप्रमाणे एकूण 15000/- व आपण पुर्वीच खरेदी केलेल्या 45 बेडशीट्स वाटल्या. दोन कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलला. (ते रोजंदारीवर काम करतात. शेतीवाडी नाही ).  शिवाय आपण त्यांच्यासाठी कपडे, साड्या नेल्या होत्या. त्याही दिल्या. अशा रितीने एकूण 1,25,000/- रुपयांची रोख मदत केली.

आपणा सर्वांचाच याकामी हातभार लागला. 

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

Previous Next

2 thoughts on “कोकणात आलेल्या पुरातील लोकांना आपुलकी कडून मदत”

  1. निलेश बाबूलाल मकवाना

    वंचितांच्या पुनर्वसनसाठी आपुलकिने आपुलकी जपुन जे समाजकार्य केल आहे करत आहे ते अनुकरणीय , प्रेरणादायी आहेच सोबत लज्जास्पद आहे की आम्ही नागरिक म्हणून समाजाला जे देणे आहे ते देतो का. समाजाप्रति ही तळमळ प्रत्येक नागरिकाने अंगिकारावी जर असे झाले तर पृथ्वी स्वर्ग होईल.

    1. Rajendra Belwalkar

      अगदी खरे आहे, निलेशजी. कुणीतरी पुढे येऊन हे करायला हवे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

Leave a Reply to Rajendra Belwalkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *