आपुलकी संस्थेची ध्येय व उद्दिष्टे

  1. महाराष्ट्रातील अनाथालय व निरीक्षण गृहातील वय वर्षे १८ / २१ नंतर बाहेर पडणाऱ्या वंचित मुलांचे पुनर्वसन करणे. ज्यांना काही नाही त्यांना सर्व काही           मिळवून देणे.
  2. सुस्थिती प्राप्त केलेल्या सेवाभावी मुला-मुलींचे संघटन करणे व निवासी संस्थांमधून बाहेर पडलेल्या लाभार्थीची सद्यस्थिती जाणून घेणे.
  3. संस्थास्थित मुला-मुलींसाठी कार्यशाळा नियोजन करणे.
  4. महिला व बाल विकास अधिकारी / कर्मचारी वर्ग व संस्थांतर्गत मुले-मुली यांच्यामध्ये सामंजस्यपूर्ण संबंध व नाते प्रस्थापित व्हावे यासाठी मध्यस्थाची                भूमिका स्वीकारणे तसेच अन्यायकारक परिस्थितीमध्ये मुलांच्या हितासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे. (समन्वयक म्हणून संस्था कार्यरत आहे.)
  5. संस्थांतर्गत मुलांसाठी असलेल्या शासनाच्या कल्याणकारी योजनांचा अभ्यास करुन त्या मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी सतत पाठपुरावा करणे व त्यांच्या             अडचणींचे निराकरण करणे.
  6. व्यवसाय शिक्षण तसेच उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन व आर्थिक मदत करणे.
  7. वंचितांसाठी रोजगाराच्या संधींचा सतत मागोवा घेणे व त्यांना रोजगार मिळवून देणे, मार्गदर्शन करणे. मानसिक दौर्बल्य व गुन्हेगारी वृत्ती यापासून मुले दूर        राहावीत यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणे.
  8. महाराष्ट्रातील विविध समित्या उदा. बाल कल्याण समिती, बाल हक्क समिती, राज्य निवड मंडळ इ. वर संस्थेमधून वाढलेल्या कर्तबगार व्यक्तींची महिला         व बालविकास अंतर्गत बालकांशी निगडीत सर्व समित्यांवर नियुक्ती प्राधान्याने व्हावी यासाठी शासनाकडे आग्रही भूमिका मांडणे.
  9. माजी विद्यार्थ्यांची संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हावार समिती स्थापन करणे.
  10. कायद्याच्या चौकटीत बसतील असे धर्मादाय स्वरुपाचे विविध उपक्रम संस्थेमार्फत यशस्वीरित्या राबविणे.
  11. वंचित मुला-मुलींना स्वत:चे घर मिळावे यासाठी दत्तक योजनेचा प्रचार, प्रसार करुन दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन करणे.
  12. नैसर्गिक, सामजिक आपत्ती मध्ये सापडलेल्या महिला, मुले तसेच दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करणे. कौटुंबिक समस्यांबाबत त्यांना प्रसंगानुरुप सहाय्य          करणे.
  13. ग्रुप होमची निर्मिती करुन निवासाची सोय करणे.